Breaking News

बाळासाहेब सोळस्कर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी

पिपोंडे, दि. 8 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील व मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी त्यांना दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून सोळस्कर यांची ओळख आहे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. सोळस्कर यांच्या निवडीमूळे आगामी निवडणुकीसाठी त्यांचा फायदा होणार आहे. यापूर्वी बाळासाहेब सोळस्कर यांनी विविध सहकारी संस्थावर काम केले आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास आहे

या निवडीबद्दल त्यांचे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, प्रदेशअध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यंमंत्री आ. अजित पवार, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, खा. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नितीन पाटील, सुनिल माने, संजय झंवर, अरूण माने, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, शिवाजीराव महाडिक, कांतीलाल पाटील, सुरेश साळुंखे, मंगेश धुमाळ, डॉ. अभय तावरे, सतीश धुमाळ, लालासाहेब शिंदे, उपसभापती संजय साळुखे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब भोईटे, संभाजीराव धुमाळ, संजय धुमाळ, शिवाजीराव पवार, भूषण पवार, तानाजी शिंदे, नागेश जाधव, विकास साळुंखे, दत्तात्रय धुमाळ, शकिला पटेल, शाहुराज फाळके, दत्तात्रय भोईटे यांनी अभिनंदन केले.