सेनेचे दोन आमदार भाजपच्या गळाला ?


सिध्दार्थ आराख/ बुलडाणा : ‘तोडा आणि फोडा’ या नितिचा वापर करून भाजपने अनेक राज्यात सत्ता काबीज केली. हे तंत्र आता 2019 च्या निवडणूकीमध्ये भाजप वापरून पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वेगवेगळया पक्षातील मोठ मोठे नेते व विद्यमान आमदारावर भाजप प्रयोग करीत आहेत. बुलडयात सुध्दा शिवसेनेच्या आमदारावर भाजपची नजर असून एक आमदार गेल्या अनेक महिण्यापासून भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते, तर एका आमदाराची बुलडाणा येथे मुख्यमंत्र्यासोबात गुफ्तगु झाल्याची चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या जिल्हयात शिवसेनेमध्ये मोठया प्रमणावर अंतर्गत गटबाजीला उधान आले आहे. 2019 च्या निवडणूका डोक्यावर येवून ठेपल्या असतानाही पक्षातील गटबाजी संपण्या ऐवजी ती अधिक वाढत आहे. घाटाखाली तर ही गटबाजी मोठया प्रमाणावर उफाळून आली आहे. या गटबाजीचा फटका पक्षातील कार्यकर्त्यांनाच नव्हे तर, विद्यमान आमदारांनाही बसत आहे. 

आमदारांच्या हक्कावर गदा आणल्या जात असल्यामुळेे आमदारामध्ये असंतोष आहे. पक्ष संघटन वाढवितांना कार्यकर्ते महत्वाचे कि, नेते महत्वाचे असा पेच अनेकवेळा आमदारांना पडतो. कोणतेही काम आमदारांना त्यांच्या मर्जीप्रमाणे करता येत नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते खाजगीत बोलतात. सध्या माजी आ. विजयराज शिंदे यांची जशी शिवसेनेत कुचंबना होत आहे तशीच काहीशी आवस्था या आमदारांची असल्याचे बोलल्या जाते. भाजपने याच संधीचा फायदा घेत यापूर्वीच एका आमदाराशी जवळकी साधत त्यांना विश्‍वासात घेतले आहे. सध्या हे आमदार भाजपच्या बडया नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच बुलडाणा दौर्यावर येवून गेले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हयाची आढावा बैठक झाली. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेच्या दुसर्या एका आमदाराची एकांतात पाच मिनिटे भेट घेतले. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी या आमदार महोदयांना नेमका काय कानमंत्र दिला याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकूणच भाजपच्या या तोडा आणि फोडा नितिला हे आमदार खरेच बळी पडतील काय? हे बघायचे आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget