Breaking News

येसवडी शाळेला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

कुळधरण : प्रतिनिधी

तालुक्यातील येसवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश करे यांच्यावतीने विविध साहित्य भेट देण्यात आले. राशीनचे उद्योजक मेघराज बजाज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

करमाळा येथील यशकल्याणी सेवा संस्थेचे संचालक गणेश करे यांच्यावतीने येसवडी शाळेस ७ सिमेंट बाके, २ कपाटे, २ रॅक, ५०० लिटर क्षमतेची पाणी टाकी, १ प्रिंटर भेट देण्यात आला. राशिनचे उद्योजक मेघराज बजाज हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक आजिनाथ मोढळे यांच्याकडून शाळेच्या कमानीसाठी पंधरा हजार रुपये देण्यात आले. सामाजिक भावनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवित असल्याचे गणेश करे म्हणाले. मेघराज बजाज यांनी करे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजू साखरे, दादा काळे, सुनील डीसले, भाऊसाहेब जंजिरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला मिळालेल्या भेटवस्तूमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.