Breaking News

रामदेवबाबांचा जय श्रीराम!

मोदी सरकारनं ही सत्तेत आल्यानंतर रामदेवबाबांच्या संस्थेला एमआयडीसीत जमिनी दे किंवा त्यांच्या उद्योगावर मेहेरनजर ठेवण्याचे अनेक उद्योग केले. महाराष्ट्रातही अधिकार्‍यांचा सल्ला डावलून कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या प्रकल्पासाठी कवडीमोल भावानं दिली. रामदेवबाबांविषयीचं भाजपचं

प्रेम असं उतू चाललं होतं. दुसरीकडं मोदी यांच्या काळात काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं स्वप्न हे दिवास्वप्न होतं, हे लक्षात आलं. त्यामुळं बाबांचाही भ्रमनिरास व्हायला लागला. मध्यंतरी त्यांनी तशी व्यथा बोलून दाखविली. राजकीय नेते निवडणुकीअगोदर बोलतात एक आणि त्यानंतर वागतात त्याच्याविरुद्ध असं बाबांच्या लक्षात आलं. सोशल मीडियातून रामदेवबाबांनी पूर्वी इंधनवाढीविरोधात केलेली वक्तव्यं आणि आताचं त्यांचं मौन याविषयी प्रचार सुरू झाला. रामदेवबाबांना अखेर जास्त काळ मौन धारण करणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी इंधनाच्या दरातील वाढीवर भाष्य करून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी केली. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारनं इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले; परंतु जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढत असलेले दर आणि रुपयाची गटांगळी यामुळं पुन्हा दररोज दर वाढत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर रामदेवबाबा हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच कच्छपी लागले होते. इंधन दरावरून ते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर तुटून पडत होते. काळ्या पैशाच्या विरोधात ते आक्रमक झाले होते. उघडउघड भाजपच्या बाजूनं आणि काँग्रेसच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यातही रामदेवबाबांच्या परकीय चलन कायद्याच्या भंगप्रकरणी काँग्रेसनं त्यांची चौकशी सुरू केली होती. त्याचा राग त्यांच्या मनात होता. गांधी कुटुंबाचे कडवे टीकाकार म्हणून रामदेवबाब ओळखले जात. रामदेवबाबांच्या योगाला मोदी यांनी जागतिक पातळीवर पोचविल्यानं मोदी यांच्याविषयी त्यांच्या मनात ममत्त्व होतं. मोदी सरकारनं ही सत्तेत आल्यानंतर रामदेवबाबांच्या संस्थेला एमआयडीसीत जमिनी दे किंवा त्यांच्या उद्योगावर मेहेरनजर ठेवण्याचे अनेक उद्योग केले. महाराष्ट्रातही अधिकार्‍यांचा सल्ला डावलून कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या प्रकल्पासाठी कवडीमोल भावानं दिली. रामदेवबाबांविषयीचं भाजपचं प्रेम असं उतू चाललं होतं. दुसरीकडं मोदी यांच्या काळात काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं स्वप्न हे दिवास्वप्न होतं, हे लक्षात आलं. त्यामुळं बाबांचाही भ्रमनिरास व्हायला लागला. मध्यंतरी त्यांनी तशी व्यथा बोलून दाखविली. राजकीय नेते निवडणुकीअगोदर बोलतात एक आणि त्यानंतर वागतात त्याच्याविरुद्ध असं बाबांच्या लक्षात आलं. सोशल मीडियातून रामदेवबाबांनी पूर्वी इंधनवाढीविरोधात केलेली वक्तव्यं आणि आताचं त्यांचं मौन याविषयी प्रचार सुरू झाला. रामदेवबाबांना अखेर जास्त काळ मौन धारण करणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी इंधनाच्या दरातील वाढीवर भाष्य करून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी केली. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारनं इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले; परंतु जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढत असलेले दर आणि रुपयाची गटांगळी यामुळं पुन्हा दररोज दर वाढत आहेत. घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत आहे. महागाई वाढत चालली आहे. त्यामुळं सरकारविरोधात नाराजीची भावना व्यक्त व्हायला लागली आहे. सरकारच्या आपण पाठिशी आहोत, अशी जनभावना झाली, तर कदाचित त्याचा आपल्या व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती आता आता रामदेवबाबांना वाटायला लागली आहे.

रामदेवबाबांनी 2014 मध्ये भाजपला समर्थन दिले होतं ; पण या निवडणुकीत ते भाजप व इतर कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाहीत असं आता त्यांनीच जाहीर केलं आहे. मी समाजवाद व साम्यवादाला विरोध करतो’ असंही त्यांनी म्हटलं आहे. योगगुरू रामदेवबाबांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जागोजागी सभा घेऊन मोदींना मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं ; पण 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रामदेवबाबा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच ं कौतुक करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मी कोणत्याही पक्षाचा नसून अपक्ष असल्याचंही ते सांगत आहेत. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मनडो लागो मनडो लागो, मन लागो मेरा यार फकीरी में’’ हा कबीरांचा दोहा सांगत त्यांनी आता मी अपक्ष आहे, कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

देशात चांगल्या लोकांचं सरकार हवं. 2014 मध्ये देशात राजकीय संकट होतं ; पण आता तसं दिसत नाही, असं म्हणत आता मी अजून काही बोलणार नाही असं वक्तव्य त्यांनी केले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बघून सरकारनं त्यावर लक्ष द्यावं, असा सल्ला रामदेवबाबांनी दिला होता. 2014 मध्ये मनमोहनसिंह यांना विरोध करणारे रामदेवबाबा आता राहुल गांधींचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्यातला हा बदल भाजपला सत्ता मिळणार नाही, याचे तर संकेत नाहीत ना, असा प्रश्‍न निर्माण करतो.
भाजपपुढं अशी एकामागून एक संकट येत आहेत. सरकारनं जर चांगला कारभार केला असेल, तर सरकारला घाबरायचं काहीच कारण नाही. विकासाच्या मुद्यावर जनतेपुढं जायला हवं ; परंतु सरकार तसं करीत नाही. उलट, सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आता आपल्याविरोधात होणार्‍या आंदोलनाची भीती वाटते आहे. मोदी यांच्यानंतर सर्वांधक सुरक्षा असलेल्या शाह यांनी खरं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही ; परंतु त्यांच्या सभांत घेतली जात असलेली काळजीच आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. बेटी बचावचा नारा देणार्‍या भाजप अध्यक्षांच्या एका रॅली दरम्यान सुरक्षेच्या नावाखाली महिला आणि तरुणींची अंतर्वस्त्रंही तपासण्यात आली. रॅलीमध्ये शाह यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत, म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार्‍या काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिला व तरुणींची अंतर्वस्त्रंही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरक्षेच्या नावाखाली त्यांनी परिधान केलेले कपडेही उतरवण्यात आले आणि त्यांची अंतर्वस्त्रंही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

छत्तीसगडच्या चरौदा येथे आयोजित महिला महासंमेलनात सहभागी होण्यासाठी शाह छत्तीसगडच्या एक दिवसीय दौर्‍यावर होते. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी कार्यक्रमात सहभागी होणार्‍या व काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिला व तरुणींची अंतर्वस्त्रंही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. रॅलीमध्ये शाह यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून हे सगळं करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या किरणमयी नायक यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. तपासणीसाठी आतापर्यंत तरुणांचे मोजे आणि पट्टे उतरवले जात होते ; पण या घटनेमुळं महिला सुरक्षेच्या मोठमोठ्या बाता मारणार्‍या भाजप सरकारची हीन दर्जाची मानसिकता उघड झाली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री बलात्कार्‍याला संरक्षण देतात, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवून उपयोग नाही. बेटी बढाव, बेटी पढावच्या जागी भाजपवाल्यांपासून मुलींना वाचवा, असे नारे आता सुरू झाले आहेत, अशी बोचरी टीका नायक यांनी केली आहे. काँग्रेसशिवाय आप’नंही या घटनेवर जोरदार टीका केली आहे.