Breaking News

पिंपळनेर परिसरात जोमात आलेले पिके कोमात


पिपंळनेर, (प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील पिपंळनेर महसूल मंडळाच्या सज्जात कमी प्रमाणात पाऊस झाला असून रिमझिम पाऊस च्या ठेंबा ठेबांन साचलेल्या ओल्या ओलीवर कापूस पिकांची लागवड केली होती त्यात झालेल्या रिमझिम पावसाने कापसाचे पिके बहरून आली होती मध्यतंरी थोडा फार कुठे कुठे दमदार पाऊसा च्या सरी बरसल्या होत्या त्यामुळे या परिसरात कापाशीचे पिक जोमात आलेले दिसले परंतु परतीच्या पावसाने पाठ फिरवली यामुळे जमीनीत आसलेली ओल निघून गेल्यानं पावसाअभावी पिके कोमात जाऊन करपू लागली आहे यामुळं झांडाची पान गळती होऊ लागल्याने डेरेदार झांडाची काडी होऊन पालापचोळा झालेला दिसत आहे यामुळे शेतकरी हातबल होऊन त्रस्त झाला आहे. शेतकर्‍यांनी शेतात मेहनतीने दिवस रात्र कबाड कष्ट करुन महागड्या बि बियाणे खरेदी करुन शेतात कापूस लागवडी केल्या असून जे पेरल्या पासुन तेच उगवे पर्यंत धक धकीत जिव ठेऊन पिकें जोपासली परंतु पिकांची जोपसना करू करू नाकीनऊ आले आहेत झाडाला ईलाज होईल अशी महागाची औषधे वापरून ती पिके रोगराई पासून मुक्त करण्यासाठी तिला जिवाफाड मेहनत घेतली परंतु पावसानं दडी मारल्याने हातात येण्या आगदोरच ती करपू लागली आहे. त्या झाडाची काडी होऊन पालापाचोळा होऊ लागला आहे. झाडाला लागलेले पाच दहा बोंडातून मिळणारे उत्पन्नातून झालेला खर्च कसा मिळेल असा प्रश्न पडत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे आवची बाव शेतकर्‍यांनी शेतात केलेला मेहनतीच खर्च ही मिळेल की काही यात शेतकरी शंका करत आसल्याने या वर्षी पदरात शेकतर्‍यांच्या संकट आले आहे हे संकट दुर करण्यासाठी पिपंळनेर महसूल मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ पिकांची पहाणी करून पंचनामे करावेत आशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतकरी संकटात सापडला आहे ,
आमच्या परीसरात गतवर्षी पेक्षा खुपच कमी प्रमाणात पाऊस पडला आहे शेतकर्‍यांनी कमी पडलेल्या पावसवर शेतीत खुप मशागत करून कापूस पिक जगविले आहे पंरतू परतीच्या पावसानं दांडी मारल्यामुळे सकाळपासुन कडक ऊन पडलेल्यानं पावसाळ्यात उन्हाळा कि पावसाळा कळेना त्यामुळं शेतकरी संकटात आडकला आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी कापूसा च्या पिकांची तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत दिली पाहिजे- श्रीकांत ठोकरे, शेतकरी मु.पो.पिपंळनेर