कर्मवीरांच्या प्रेरणेतून स्व. काळेंनी ‘रयत’चा वटवृक्ष फुलविला : काळे


कोपरगाव / प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना मोठा त्याग करावा लागला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना आपल्या पत्नीचे सौभाग्यलेणे अर्थात मंगळसूत्र गहाण ठेवले होते. त्यांचे अथक प्रयत्न व संघर्षातून श्रीमंतांची शिक्षणाची मक्तेदारी मोडीत निघून कष्टक-यांची, शेतक-यांची व बहुजनांची मुले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेवू शकली. कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून माजी खा. कर्मवीर शंकरराव काळेंनी प्रेरणा घेवून काम करण्याची दिलेल्या संधीतून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविला, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३१ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग. र. औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर श्रुतिका औताडे, श्रुती डोंगरे व साक्षी फटांगरे यांनी उत्कृष्ट भाषण केले. त्यांचे युवा नेते आशुतोष काळे यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, उत्तमराव औताडे, एम. टी. रोहमारे, योगेश मच्छिंद्र औताडे, साईनाथ रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे,निवृत्ती शिंदे, नंदकिशोर औताडे, जयंत रोहमारे, बाळासाहेब घुमरे, रोहिदास होन, दिलीप औताडे, सोपानराव आभाळे, साहेबराव राहणे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, मढीच्या सरपंच वैशाली आभाळे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, सचिन मुजगुले, भाऊसाहेब कु-हाडे, केशव जावळे, भाऊपाटील गुंजाळ, कमलाकर शिंदे, सिकंदर इनामदार, कौसर सय्यद, प्राचार्य कोकाटे आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. टी. रोहमारे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती देव्हारे यांनी केले. व्ही.व्ही. शिंदे यांनी आभार मानले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget