अंबाजोगाईत विवाहितेची आत्महत्या


अंबाजोगाई, (प्रतिनिधी): येथील क्रांती नगर भागातील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी हरीश्चंद्र गडसिंग (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता तिने पत्र्याच्या आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पती कामावर आणि मुले बाहेर गेली असल्याने यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. जवळच राहणारे वडील तिच्याकडे आले असता लक्ष्मीने आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार मोरे यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत लक्ष्मीच्या पश्चात पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget