Breaking News

संविधान वाचविण्यासाठी मेळावे होणे गरजेचे-सोळंके


माजलगांव(प्रतिनिधि)- तालुक्यांतील राजेगाव, रिधोरी, गव्हानथडी,वाघोरा,वारोळा, माळेवाडी, शहापुर, सुर्डी, किट्टीआडगांव अशा ९ शाखेच्या उद्घाटन दि.११ गुरूवार रोजी मान्यवरांकडून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजीमंत्री प्रकाश सोळंके हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमभाऊ डावरे हे होते.तर प्रमुख उपस्थित पाहुणे राम किरवले, साहेबरावअण्णा पोटभरे,अनिल तुरुकमारे,अरुण कचरे,बाबासाहेब साळवे, वसंत वाव्हळकर,बाबा आगे, सिद्धार्थ ससाणे,राकेश साळवे व इतर उपस्थित होते. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वतिने संविधान चेतना मेळाव्यांमध्ये ९ शाखांचे उद्घाटन करण्यात आले.तसेच गायरान जमिन व इतर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे साहेबराव पोटभरे यांना पिपल्स पार्टीच्या वतिने समाजरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन माजीमंत्री प्रकाश सोळंके म्हणाले कि,हे सरकारकडून सुधारणा करण्याच्या नावाखाली गरिबांना अच्छे दिनाचे स्वप्ने दाखवले.पण देशात आज अराजकता माजली आहे.संविधान बदलविण्याचे षडयंत्रच हे जातीयवादी सरकार करत आहे.जातिधर्माच्या नावाखाली हे बुवा - बाबांना पोसुन गरिबांवर अन्याय करत आहेत. त्यामुळे अशा जातियवादी सरकारला नेस्तनाबूद करण्यासाठी हे संविधान चेतना मेळावे सर्वत्र होणे गरजेचे आहे.

भारतीय संविधान हे जगांत महान आहे.ते सर्वांना समान न्याय आहे.त्यामुळे त्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे.उत्तम डावरे म्हणाले कि,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहुन देशातिल सामान्यजनांचा विचार करुन ते निर्माण केले आहे.पण हे भाजपा सरकारकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.त्यामुळे संविधानाबाबत सर्वसामान्यापर्यंत जनजागृती झाली पाहिजे. तसेच राम किरवले,अनिल तुरुकमारे,व इतरांनी समोयोचित भाषणे केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ ससाणे यांनी केले तर सुत्रसंचालन सिरसट तर आभार राकेश साळवे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमतारा मित्रमंडळाचे आयोजक महादेव आगे,रोहिदास सिरसट,आण्णा पटाईत,केशव ससाणे,कुमार ससाणे,राहुल सिरसट यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी परिसरातिल लोक खुपमोठ्याप्रमाणात हजर होते.