Breaking News

काँग्रेसचे सय्यद यांनी शाळेला दिले रांजण


जामखेड ता. प्रतिनिधी

जामखेडमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद जमीर यांनी ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रांजन दिले. यावेळी युवा नेते अमजद पठाण, राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन हुलगुंडे, सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख, मुख्याध्यापक रहीमोद्गदीन शेख, शिक्षक शकील बागवान, फिरोज खान, समद शेख, अरफात कुरेशी आदींसह सर्व महिला शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.