‘ज्योतिक्रांती’मुळे अनेकांना रोजगार : पालकमंत्री प्रा. शिंदे


जामखेड प्रतिनिधी

महिला बचतगटापासून सुरु झालेली महिलांची चळवळ रूपांतरित होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ज्योती क्रांती संस्थेने देशभरात भरारी घेतली आहे. ज्योती क्रांती दुग्ध उत्पादनांमुळे शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

क्रांती ज्योती फूड प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या या बायप्रोडक्ट निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच झाले. 

यावेळी ते बोलत होते. दरम्यान, ज्योतीक्रांती या नावाने सुरु केलेल्या उत्पादनांच्या वितरणाचे जाळे राज्यभर करणार असल्याचे चेअरमन धनलक्ष्मी हजारे यांनी सांगितले. 

जवळा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक आदिनाथ हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपापल्या सौभाग्यवतींना एकत्र आणत १८ वर्षांपूर्वी ज्योती क्रांती महिला बचत गटाची स्थापना केली. धनलक्ष्मी हजारे, वंदना हजारे, संगीता रोडे, लता हजारे, सुमन रोडे या महिलांचा उत्साह व समर्पण पाहून त्यांनी त्यांना पाठबळ दिले. याच बचतगटाची नंतर ज्योती क्रांती पतसंस्था झाली. तालुक्यात तिच्या पाच शाखा सुरू झाल्या. त्यानंतर राज्यभरात ४६ शाखा सुरू झाल्याने ही संस्था मल्टीस्टेट झाली. या महिला नव्याने दूधाच्या व्यवसायाकडे वळल्या. ग्रामीण भागातील महिलांनी टाकलेल्या या धाडसी पावलाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget