Breaking News

धूळपेर' कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न


जामखेड ता. प्रतिनिधी 

येथील ज्येष्ठ कवी प्रा. आ. य. पवार यांच्या ‘धूळपेर’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. तालुक्यातील फक्राबाद येथील आणखेरीदेवी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात अगदी साध्या पध्दतीने हा कार्यक्रम पार पाडला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दशरथ कोपनर, प्रा. ज्योती क्षीरसागर, वंदना नागरगोजे, दादासाहेब मोहळकर, कवी प्रा. आ. य. पवार, राजेंद्र सातपुते आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार यांच्या या कव्यसंग्रहात ६३ कविता आहेत. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची या कविता संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. ‘रानजाई’ प्रकाशन पुणे यांनी या संग्रहाच्या निर्मितीचे काम केले आहे. यापूर्वी प्रा. पवार यांचे ‘सिना काठच्या कविता’, ‘रानमाती’, ‘ऊन-पाऊस’ हे कविता संग्रह, ‘करकुंजाचा थवा’, ‘बालसाहित्य’, ‘आंब्यावरचा राघू’ कथासंग्रह असे साहित्य प्रकाशित झाले आहेत. या साहित्यावर दोन समीक्षक ग्रंथ व दोन प्राध्यापकांनी पीएच.डी. आणि एम फिल. मिळविली आहे.