Breaking News

परळीत उड्डाण पुलावर अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू


परळी (प्रतिनिधी)- येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. गाडीचा चाक फुटल्याने गाडीने चार ते पाच पलट्या घेतल्या. या अपघातात अजय दशरथ गित्ते (वय २३, रा. सोमेश्वर नगर, परळी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहनांची गर्दीच गर्दी झाली होती. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीची झायलो गाडी (एमएच १५ डिजे ५५५१) हि गाडी श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरून जात असताना टायर फुटल्याने गाडीने ३-४ पलट्या घेतल्या. या अपघातात अजय गित्ते या तरुणाचा जागीच मृत्यू झाल. अपघात एवढा भीषण होता कि घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघात झाल्यानंतर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळावर झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गर्दीला पंगवल्यानंतर मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.