सामाजिक, धार्मिक सेवा युवक मंडळांना आदर्शवत : आ. कांबळे


राहुरी प्रतिनिधी 

येथील शांती चौक मित्रमंडळासारखी मंडळे युवकांच्या माध्यमातून तयार होणे, ही आज काळाची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपत असताना आपला वेगळा ठसा निर्माण करत या मंडळाने केलेली सामाजिक धार्मिक व शैक्षणिक या सर्वच पातळ्यांवर केलेली सेवा ही युवक मंडळांना आदर्शवत ठरणार आहे, असे प्रतिपादन आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले. 

राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त यावर्षी आयोजित केल्या गेलेल्या श्रीकृष्ण रासलीला देखाव्याचा उद्घाटन समारंभ नुकताच आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

याप्रसंगी साई दर्शन मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष आनंद कदम, भाऊसाहेब पगारे, शिवसेनेचे राहुरी फॅक्टरी शाखाप्रमुख विजय गव्हाणे, माजी नगरसेवक विश्वास पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील कराळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे संचालक आबासाहेब वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते वैभव गिरमे, भीमशक्ती संघटनेचे विलासराव साळवे, दीपक पठारे, संतोष चोळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget