Breaking News

विठ्ठल दादा पंडीत यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश


माजलगाव (प्रतिनीधी) तालुक्यातील गंगामसला गाव येथिल रहिवाशी विठ्ठल दादा पंडीत यांचा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन नांदेड येथे मराठवाडा कार्यकर्ता मेळाव्यात केला जाहीर प्रवेश असे की, आंबेडकरी चळवळीत गेल्या तीन दशकापासुन निस्वार्थ वृत्तीने काम करत चळवळीला गतीमान केले आहे. माजलगाव तालुक्यातील गोर - गरीब, कष्टकरी पीडीतांचे कैवारी अशी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापासुन आंबेडकरी चळवळीला नेटाने उभी करून समाजला सत्येत बसविण्याचा प्रयत्न केला . पण चुकीच्या नेतृत्वामुळे चळवळ ही लयास गेल्याने आंबेडकरी घराण्याची एकनिष्ठा जपत महाराष्ट्राचे सरसेनानी आद. आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक पौळ, स्वप्निल ब्रह्मराक्षे, भास्कर साळवे, शुध्दोधन ढवळे, राजेश गोटे होते.