Breaking News

ई-कॉमर्स कंपन्यांवर कायदेशीर अंकुश ठेवावा सीएआयटीनेची सरकारला मागणी


नवी दिल्ली - व्यापारी संघटना सीआयआयटी देशात ई-वाणिज्य व्यवसायावर अंकुश ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या नियमन आणि नियंत्रणासाठी सरकारने बाजाराचा समतोल राखणारा कायदा आणावा, अशी मागणी सीएआयटीने केली. व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे की, विविध सण-उत्सवांदरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे दिली जाणारी सूट बाजाराचा समतोल बिघडवण्यास कारणीभूत ठरते. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटले आहे की, व्यापार्‍यांकडून विक्री करण्याऐवजी त्या थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. त्यांना याची परवानगी नाही. उ-खढने या प्रकार सरकारच्या एफडीआय धोरणाविरोधात असल्याचे म्हटले आहे. संघटनेने म्हटले की, सरकारने वेळोवेळी ई-कॉमर्स कंपन्यांना अशा प्रकारचे बाजाराचा समतोल बिघडवणार्‍या क्लृप्त्यांना रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याची गरज आहे.