Breaking News

रेल्वे प्रशासनाकडून लाखो लिटर पाणी


मनमाड - मनमाड शहर हे पाणी टंचाईचा विळाख्यात सापडले असतांना रेल्वे प्रशासनाकडून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दृश्य बघायला नागरीकांना मिळत आहे.

शहरात पाणीप्रश्न गंभीर असताना येथील रेल्वे प्रशासनाचे इंजिनिअरींग कारखान्याजवळ असलेल्या पाण्याची टाकीही गळकी असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे रेल्वे प्रशासनाच्या वसाहतीला आठ ते दहा दिवसाआड पिण्याचे पाण्याचे पुरवठा होत असताना लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने प्रशासनाला काळजी नाही का ? असे रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या नागरीकांमध्ये पाणीप्रश्नाबाबत चर्चेला उधाण आले आहे.