Breaking News

महागाईच्या विरोधात अंबाजोगाईत बीआर एस पी च्या वतीने मोर्चा


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बी आर एस पी चे राष्ट्रीय अध्यक्ष अड. डॉ. सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली काल अंबाजोगाईत वाढती महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्येकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसाला जगणं असह्य झालं असून शासनाकडून कोणत्याही प्रकारची पर्वा केल्या जात नाही.

पेट्रोल,डिझेल, गॅसची झालेली दरवाढ पाहता माणसांचे जगणे असाह्य झाले आहे. यामुळे आज अंबाजोगाईत बी आर एस पीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.येथून निघालेला मोर्चा अहिल्याबाई होळकर चौकातून रिलायन्स पंपावर गेला येथील रिलायन्स पेट्रोल पंपावरील पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल आणि पेढा भरवून शासनाचा निषेध करण्यात आला. मोर्चात बैलगाडी ला बुलेट ट्रेन संबोधन्यात आले होते. मोटार सायकल ढकलत मोर्चे कार्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
यावेळी अड.माणिक आदमाने(महाराष्ट्र प्रदेश सचिव), ज्ञानोबा कांबळे(बी आर एस पी लोकसभा अध्यक्ष बीड), मयूर कांबळे, कुंदन सरवदे,स्वप्नील ओव्हाळ, आकाश बनसोडे, अड अमोल हजारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते