Breaking News

सप्तशृंगी माता मंदिरात घटस्थापना


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

येथील निवारा वसाहतीतील श्री सप्तशृंगी माता मंदिरात तृतीय वर्धापनदिन व नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वसाहतीतील साईनिवारा मित्रमंडळ, समता परिवार, सुभद्रनगर प्रतिष्ठान, रायगड मित्रमंडळ व कृष्ण विनायक मित्रमंडळाच्या सौजन्याने दि. १० ते २३ दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. कै. काशीबाई कोयटे यांच्या देणगीतून साकारलेल्या या मंदिरात बुधवारी संदिप कोयटे तसेच विकास जोशी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. 

नवरात्रौत्सवानिमित्त मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ रोजी श्री सप्तशृंगी माता मंदिर वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. भाविकांनी व निवारा परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई निवारा मित्रमंडळाचे अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम सभापती जनार्दन कदम, नगरसेविका दीपा गिरमे, सुभाद्रनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली जाधव, साई निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा कदम व स्थानिक मार्गदर्शक समितीच्या सदस्यांनी केले आहे. ==========
भाटेपुरीत महिलांचा राडा; महाराजाच्या सेवकाला हाकलर्लेें
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह नायब तहसिलदारांची भेट; शांततेचे आवाहन
गेवराई (प्रतिनिधी):- दोन महाराजांच्या वादामुळे भाटेपुरी गावाची बदनामी होवू लागली आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी दि.११ रोजी गावात दाखल झालेल्या एका महाराजाच्या सेवकाला धक्काबुक्की करत हाकलून दिल्याचा प्रकार घडला. सदरील घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधिक्षक अर्जुन भोसले, नायब तहसिलदार जाधवर यांनी तात्काळ भेट देवून संतापलेल्या महिलांना शांततेचे आवाहन केले. गावात तणावपुर्ण शांतता होती.
गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथील दोन महाराजांमध्ये गादीवरुन वाद झालेला आहे. चार ते पाच दिवसापुर्वी एका महाराजांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यामुळे संबंधित महाराजाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा गावामध्ये राडा झाला असुन तेथील पुर्वीचे महादेव महाराज हे सेवकासह त्याठिकाणी आले असता संतप्त महिलांनी सेवकाला गावात येण्यास मज्जाव केला. तुमच्यामुळे गावाची बदनामी होत आहे असे म्हणत संबंधित सेवकाला हाकलून दिले. सदर प्रकाराची माहिती कळताच पोलिस उपअधिक्षक अर्जुन भोसले ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. नायब तहसिलदार जाधवर यांनी देखील गावात भेट देवून शांततेचे आवाहन केले आहे. गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.