Breaking News

प्रतिक पवारची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


फलटण(प्रतिनिधी) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फलटणचा विद्यार्थी पै. प्रतिक किशोर पवार याने भुईंज (जि. सातारा) येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील 45 किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समिती उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांच्यासह अनेकांनी पै. प्रतिक पवार याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचे सुपुत्र पै. प्रतिक पवार यांना क्रीडा शिक्षक राम सारंग, दत्ता माने तसेच माजी नगरसेवक पै. हेमंत निंबाळकर, प्रकाश बोंद्रे, खशाबा कर्चे यांचे प्रतिक याला मार्गदर्शन लाभले.