महिलेचा दगडाने ठेचून खून : गंधारी शिवारातील घटना


 लोणार,(प्रतिनिधी): एका अनोळख्या 35 वर्षीय महिलेचा तालुक्यातील गंधारी तलावाजवळील गट नं.216 मध्ये अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना 20 ऑक्टोबर 2018 रोजी उघडकीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, 35 वर्षीय अनोळखी महिलेला गंधारी येथील तलावाजवळील शिवारात डोक्यात दगड घालून निर्दयीपणे खून करण्यात आला असून 20 ऑक्टोबर 2018 ला गुरे-ढोरे चारणार्‍या युवकांनी सदर मृतदेह बघितला 3 ते 4 दिवसाअगोदर सदर खून केल्या मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने सदर गुरे ढोरे चारणार्‍या युवकांनी सदर बाब गंधारी ग्रामस्थांना दिली ग्रामस्थांनी या बाबत माहिती लोणार पो.स्टे.ला दिली लोणार ठाणेदार राजेंद्र माळी, पी.एस.आय.ज्ञानेश्‍वर थोरात, बीट जमदार अशोक चाटे, सुरेश शिंगणे, चंद्रशेखर मुरडकर, मोहन जाधव, रवींद्र बोरे,प्रदीप सोनवणे,विशाल धोंडगे यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला सदर मृतदेहाच्या उजव्या हातावर राम असे मराठीत गोंदलेले आढळले असून घटनास्थळी ज्या दगडाने खुन केला त्यावर रक्ताचे डाग आढळून आले यावेळी बुलडाणा येथील फोरेन्सिक टीमचे जि.एस.शिंदे, राजेश बच्छीरे, शरद दळवी, शेख वसीम यांनी घटनास्थळावरील नमुने घेतले तसेच सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गवई, डॉ.शहा यांना शवविच्छेदन केले व घटनास्थळीच सदर महिलेचा रितीरिवाजाप्रमाणे दफनविधी करण्यात आला असून सदर अंत्यसंस्कारासाठी गंधारी सरपंच शेषराव सानप, सावरगाव मुंढे सरपंच संतोष मुंढे, आसाराम राठोड, कुंडलिक मुंढे, कैलास राठोड पो.पा.संदीप नागरे, संतोष कचरे महसूल विभागाचे काळबागे यांनी मोलाची मदत केली असून पुढील तपास ठाणेदार राजेंद्र माळी करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget