आ. मोनिक राजळे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनशेवगांव प्रतिनिधी

तालुक्यातील सोनविहीर येथे आज दि. ४ मुख्यमंञी ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. बोधेगाव, सोनविहिर फाट्यापासून ते गावापर्यंत येण्यासाठी रस्ताच राहिला नव्हता. त्यामुळे रस्त्याच्या या कामामुळे भागातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची अडचण दूर होणार आहे. 

यावेळी तालुक्यातील या रस्त्यासाठी ३ कोटी ४५ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मुख्यमंञी सडक योजनेतून मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. राजळे यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण मुंढे, वाय. डी. कोल्हे, कमल खेडकर, चापडगांवच्या सरपंच सरोजिनी गायकवाड, केदारेश्वरचे संचालक भाऊसाहेब मुंढे, रामजी केसभट, कासम शेख, उमेश भालसिंग, विनोद मोहिते, दिगंबर काथवटे, वजीर पठाण, संदिप देशमुख, अशोक खिळे, शरद विखे, नवनाथ भवार, अशोक विखे, शंकरराव गुठे, कैलास बुधवंत, रामेश्वर तांबे, उषा होळकर, रमेश चौधरी, रंगनाथ बटूळे, अंबादास ढाकणे, संजय खेडकर, अंकूश कुसळकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, दुष्काळाबाबत लवकरच पालकमंत्र्यांशी मतदारसंघाच्या परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget