Breaking News

मॅग्रोजची कत्तल करणाऱ्यावर कारवाई; त्या जागेवर पुन्हा मॅग्रोजची लागवड करा


ठाणे : प्रतिनिधी

मुंब्रा परिसरात राजरोसपणे मॅग्रोजची कत्तल करून भरणी भूमाफिया टाकीत आहेत. तर खाडीत बेकायदेशीर रेती उपसा करून पर्यावरणाचा नाश करीत आहेत. या आशयाच्या अनेक तक्रारी केल्यानंतरही प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक करीत आहे. याच्या निषेधार्थ मुंब्रा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ता इराकी आरिफ नवाज यांनी बेमुदत धरणे आंदोलन आज पासून सुरु केले आहे. मॅग्रोजची कत्तल करणाऱ्या विरोधात कारवाई करून त्या बळकावलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा मॅग्रोजची लागवड करावी अशी मागणी इराकी आरिफ नवाज यांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत धरणे सुरूच राहील असा निर्धारही इराकी यांनी व्यक्त केला.


मुंब्रा परिसर खाडी परिसर असून भूमाफिया राजरोसपणे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत खाडी किनाऱ्यावरचे मेंग्रोज तोडून त्यावर खाडीत भाराव टाकण्यात येत आहे. तर रेतीमाफिया रेती उपसा परवानगी नसताना बंदी असतानाही रोजच रेती उपसा करीत आहेत. मुंब्रा तलाठी यांना तक्रार केल्यानंतर त्याच्याकडे काना डोळा करणायत येत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता इराकी आरिफ नवाज यांनी केला आहे. इराकी यांनी अधिकारीवर्ग आणि रेतीमाफिया यांच्या संगनमताने देसाई खाडी, मुंब्रा स्टेशन परिसर, साईनाथ मंदिर परिसर आणि चुआ पूल याठिकाणी आजही राजरोसपणे रेती उपसा करण्यात येत आहे. 2006 साली याच रेतीउपसा आणि मेग्रोज कत्तलीबाबत इराकी नवाज यांनी याचिका क्र 87 न्यायलयात दाखल करणायत आली होती. या याचिकेवर न्यायलयाने 83 पानाचे निर्देश न्यायमूर्ती ए एस ओक आणि रियाज आय. छगला यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. कि ज्या भागात मेग्रोजची कत्तल करून भराव टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणी पुन्हा मेग्रोज लागवड करावी. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करून भूमाफियांनी भराव टाकून कब्जा केलेली जमीनिवार पुन्हा मॅग्रोजची लागवड करावी या मागणीसाठी इराकी यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.