जनतेच्या उन्नत विकासाठी उदंड आयुष्य हवे : आ. कोल्हे


कोपरगांव श. प्रतिनिधी : 

विकासाच्या किना-याला मतदारसंघातील जनता जनार्दनांची साथ आहे, म्हणूनच अहोरात्र झटून काम करीत आहे. येथील सर्वधर्मीय समाजच मी आपला परिवार मानला. त्यांच्या उन्नत विकासासाठी परमेश्वराने उदंड आयुष्य आरोग्य द्यावे, हेच ईश्वरचरणी मागणे आहे, असे कृतज्ञतापूर्वक उदगार आ. स्नेहलता कोल्हे यांनी काढले. तालुक्यातील जनतेच्यावतीने वाढदिवसानिमीत्त सत्कार स्विकारतांना त्यांना गहिवरून आले. 

आ. कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर व तालुका भारतीय जनता पार्टी, संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी महिला बहुउददेशीय स्वयंसहायता बचतगट संस्था आणि विविध संस्थांच्यावतीने आज दि. ८ विविध उपक्रम पार पडले. यात शहर स्वच्छता अभियान तसेच साथींचे आजार उच्चाटनांसाठी किटकनाशक फवारणी, लायन्स मुकबधिर विद्यालयातील शंभर विद्यार्थाना दहा लाख रूपये किंमतीचे डिजीटल श्रवणयंत्राचे विनामूल्य वाटप, अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतून बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेयपयोगी संचाचे वाटप, दारिद्रयरेषेखालील लाभार्थाना पंतप्रधान मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत गुरूराज गॅस एजन्सीकडुन गॅस संचाचे वाटप, महिला बचतगटांना जिल्हा बॅंकेच्यावतींने २८ लाख ७७ हजार तर आयसीआयसीआय बॅंकेकडुन ५ लाख ८१ हजार एकुण ३४ लाख ५८ हजार रूपयांचे कर्जवितरण आदी उपक्रमांचा समावेश आहे. येथील कलश मंगल कार्यालयात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

ग्रामीण भागात स्वच्छता अभियान पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, रूग्णांना फळांचे वाटप, तर गरजु होतकरू मुला मुलींना शालेय साहित्य गणवेशांचे वाटप आणि वैभव आढाव यांच्यवतीने नी आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलींना मोफत गणवेश वाटप व मिष्टान्न भोजनासह आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाचे छोटु जोबनपुत्रा, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे व सर्व संचालक उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल शिवसेनेचे कैलास जाधव, विधीज्ञ रवींद्र बोरावके, नगर बचतगट मार्गदर्शक अनिल परदेशी, कैलास गवळी आदींसह सर्व नगरसेवकांनी आ. कोल्हे यांचा सत्कार केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget