Breaking News

जायकवाडीस पाणी सोडण्याचा एकतर्फी निर्णय करू नये-कोल्हे


कोपरगाव श. प्रतिनिधी : 
चालु वर्षी गोदावरी कालवे लाभक्षेत्रात पुरेशा प्रमाणांत पाउस पडलेला नाही परिणामी विहीरींनी पाण्यांचा तळ गाठला आहे, समन्यायी पाणी वाटपाचा फटका प्रत्येकवेळी बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांवर बसतो आहे, दारणा गंगापुर धरणांतील पाण्यांवर वाढत्या बिगर सिंचनामुळे येथील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्यांच्या पाण्यांचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे, परतीच्या पावसांने पाठ फिरविली खरीप हंगामातही पाउस झाला नाही तेंव्हा अशा परिस्थितीत जायकवाडीस तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यातुन पाणी सोडण्यांचा एकतर्फी निर्णय घेवु नये अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे बिपीनदादा कोल्हे यांनी एका पत्राद्वारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक अजय कोहरीकर व महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण मुंबई यांच्याकडे केली आहे.
बिपीनदादा कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पश्‍चिमेचे समुद्राला वाहुन जाणांरे पाणी वळवून नगर नाशिकसह औरंगाबादचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटावा यासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सन 2000 मध्ये विधीमंडळात मंजुरी घेतली त्याचे काम प्राधान्यांने हाती घेवुन ही कार्यवाही झाली असती तर चालु वर्षी हा प्रश्‍नच निर्माण झाला नसता. बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांवर सन 2012 पासून सातत्यांने अन्याय होत आहे. याबाबत माजीमंत्री शंकरराव कोल्हे व कारखान्यांने तसेच गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितींने थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिलेला आहे, विरोधक यात केवळ राजकारण करून शेतक-यांत दुही निर्माण करीत आहेत. जायकवाडी धरणांत चालु हंगामात दारणा गंगापुर धरणांतुन आतापर्यंत सर्वाधिक 25 टीएमसी पाणी दिलेले आहे, तेथील पाण्यांचा साठा शासन धोरणाप्रमाणे 67 टक्क्याच्या वर आहे, सध्या तेथील पाण्यांचे बाष्पीभवन 13 टक्के असतांना ते जाणून बुजुन चुकीच्या पध्दतींने 26 टक्के दाखविले आहे, चुकीच्या आकडेवारीचा मनस्ताप दरवर्षी बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना भोगावा लागत आहे, मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा आहे, मराठवाडयाच्या पाण्यांला आमचा विरोध नाही पण येथील कमी साठवण क्षमता असलेल्या धरणांतील पाणी चालु वर्षी पाउसच न झाल्यांने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यांने नागरिक व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांसाठी त्याची गरज भासणार आहे एैन दिवाळीतच कोपरगांव तालुक्यात टँकरच्या झळा चालु झाल्या आहेत, पाउस नसल्यांने गोदावरी नदीवरील बंधारे कोरडे आहेत, कोपरगांव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी जायकवाडीस सोडल्यास त्याचा नाश होवुन येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल तेंव्हा याबाबतचा कुठलाही एकतर्फी निर्णय करण्यांत येवु नये असेही कोल्हे शेवटी म्हणांले. या पत्राच्या प्रती पाटबंधारे मंत्री, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक व संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणेस देण्यांत आल्या आहेत.