Breaking News

विरभद्र देवस्थान मंडळ निवड कार्यक्रमाला स्थगिती


राहाता / प्रतिनिधी

येथील राहाता विरभद्र देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाला पुण्याच्या धर्मदाय सह आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली असतांना नगरच्या उपधर्मदाय आयुक्तांनी सन २००७ सालच्या विश्वस्त मंडळाची निवड योग्य असल्याचा निर्णयही दिला आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळ बरखास्तीला स्थगिती

देण्यात आली. सन २००७ साली देवस्थान विश्वस्त मंडळाने नवीन घटना करून १५ विश्वस्त मंडळाची निवड केली होती. या निर्णयाविरोधात सन २००७, सन २०१२ व सन २०१८ या काळातील विश्वस्त मंडळांने पुणे येथील धर्मदायसह आयुक्त दिलीप देशमुख यांच्याकडे अपील दाखल करून नगरच्या उप धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाला विश्वस्त भागूनाथ गाडेकर, चांगदेव गिधाड, सुनिल सदाफळ, व सागर सदाफळ यांनी आव्हान दिले होते. त्याचा निकाल देताना सन २००७ चा चेंज रिपोर्ट मान्य करत ते विश्वस्त मंडळ वैद्य ठरवत पुढील सन २०१२ व सन २०१८ या काळातील विश्वस्त मंडळाला अपिल करण्यासाठी मुदत दिली. तसेच तोपर्यंत निवडणूक कार्यक्रमही स्थगित ठेवण्याचा आदेश उपधर्मदाय आयुक्तांनी दिला.