Breaking News

अंबाजोगाई,केज तालुक्यात हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे-मुंदडा


अंबाजोगाई (प्रतिनिधी):२४आँक्टोबर या मुदतीपर्यंत आँनलाईन द्वारे शेतकरयांना नोंदणी करण्यासंदर्भात शासनाने सांगितले होते मात्र अद्यापही ही खरेदी केंद्र न सुरु झाल्याने शेतकरयांसमोर याच संदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे ही स्थिती लक्षात घेता शासनाने कोणत्या ही परिस्थितीत बीड जिल्ह्यात ही खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात तात्काळ पाऊले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे.शेतकरयांच्या मालाला योग्य भाव देवुन त्यांचे हीत साधण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र राज्यात सुरु केले आहे मात्र बीड जिल्हातील केज,अंबाजोगाई याठिकाणी ही खरेदी केंद्र अद्यापही सुरु न करण्यात आल्यामुळे शेतकरयांची मोठी अडचण होत असे ते म्हणाले याच संदर्भात सोमवारी उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

याचसंदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे,शासनाने हमीभाव जाहीर केले आहेत त्या हमीभावाने शेतकरयांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केले आहे,मात्र बीड जिल्हा केज व अंबाजोगाई तालुक्यात अद्यापही खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत,राज्याच्या अन्य जिल्ह्यात हे काम तातडीने पुर्ण करण्यात आले आहे,बीड जिल्ह्यात ही खरेदी केंद्रे नसल्याने शेतकरयांना आपला माल हमीभावापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे,आधीच रब्बीची पेरणी नाही त्यात सोयाबीनचा उताराही कमी आला आहे,या परिस्थितीचा विचार शासनाने गांभीर्याने करण्याची गरज आहे,आँनलाईन नोंदणीची मुदत जाहीर झाली असली तरी बीड जिल्ह्यात ही खरेदी केंद्रे सुरु झाले नाहीत आधीच हा जिल्हा दुष्काळात होरपळत असल्याने शेतकरयासमोर मोठे संकट उभे आहे,ही बाब लक्षात घेवुन शासनाने हा प्रश्न तात्काळ सोडवावा मुग उडीद सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे त्याचबरोबर आँनलाईन खरेदी केंद्राची मुदत वाढवण्याची मागणीही मुंदडा यांनी केलेली आहे. 
सोमवारी उपजिल्हाधिकारी यांना वरिल मागणीचे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, बाजार समिती सभापती मधुकर कांचगुंडे, पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख, बालासाहेब शेप, वैजनाथ देशमुख, संगमेश्वर महाजन, शरद इंगळे, अँड. भैरवनाथ देशमूख, बालासाहेब पन्हाळे, शेख नुर पटेल, शेख सुजात भाई यांची उपस्थिती होती.