Breaking News

दानशुरांच्या मदतीतून झाली शिंदेच्या आजारावर झाली शस्त्रक्रिया बिलिवर्स चर्चा वतीने दानशुरांचा सन्मान


उमापूर, (प्रतिनिधी): बारा वर्षापासून उपचाराअभावी एका जागेवर खिळून पडलेल्या गणपत शिंदे यांच्या पायावर दानशुरांनी केलेल्या मदतीतून यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे गणपत शिंदे यांच्या मदतीसाठी धावलेल्या मान्यवरांचा उमापुर येथील बिलिवर्स चर्चच्या वतीने आयोजित केलेला ऋणानुबंध सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांचा सन्मानचिन्हासह गौरव करण्यात आला.गेवराई तालुक्यातील उमापुर येथील गणपत शिंदे यांच्या पायाला जखम झाली होती. मात्र गरीब परिस्थितीमुळे ते उपचार घेऊ न शकल्याने ही जखम दुर्धर आजारात बदलली. परिणामी उपचाराअभावी गणपत शिंदे हे मागील बारा वर्षापासून एका जागेवर अंथरुणावर खिळून होते. 

घरी जमीन नसल्याने त्यांची पत्नी व वयोवृद्ध आई-वडील मोलमजुरी करुन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीखाली जिवन जगत होते. दरम्यान त्यांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मदतीचे हात पुढे येऊन यामधून त्यांच्या पायावर औरंगाबाद येथील डॉ. कंदरफळे यांच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तब्बल बारा वर्षानंतर गणपत शिंदे यांनी पुन्हा पाऊल टाकल्याने त्यांच्या आयुष्यात हास्य फुलले आहे. यामुळे शिंदे कुटुंबांच्या मदतीला धावून आलेल्या मान्यवरांचा ऋणानुबंध सोहळा बिलिवर्स चर्चचे रेव्ह. फादर विनय कापसे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे व ग्रामस्थांनी आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, पत्रकार विनोद नरसाळे, स्नेहसावली बालघरचे संचालक निलेश मोहिते, अमर हजारे, सामाजिक कार्यकर्ते मिठ्ठू आंधळे, अँड.लक्ष्मण कुलकर्णी, पीएसआय विजय जोगदंड यांचा सन्मानचिन्हासह गौरव