जेथे मागणी असेल तेथे प्राधान्याने टँकर द्या : आ. थोरात

संगमनेर प्रतिनिधी

संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. पर्जन्यछायेखाली नसल्यामुळे पाऊस व पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. प्रशासनाने शासकीय तांत्रिक अडचणी नंतर पूर्ण कराव्यात. मात्र जेथे मागणी असेल तेथे प्राधान्याने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करावेत, अशी सूचना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केल्या. प्रांताधिकारी कार्यालय येथे पिण्याच्या पाण्याच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, शंकर खेमनर, सिताराम राऊत, मिरा शेटे, विष्णुपंत रहाटळ, किरण मिंडे, बेबी थोरात, सुनंदा जोर्वेकर, माजी सभापती अविनाश सोनवणे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ. थोरात म्हणाले, या तालुक्यात १७१ गावे व २४० वाड्या-वस्त्या आहेत. त्यापैकी १६ गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. कमी पावसामुळे काही भागात पाणीटंचाई होत आहे. मागणी व प्रस्तावानंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले पाहिजे. दुष्काळ निवारण कामात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शासकीय मंजुर्‍या, तांत्रिक कारणे सांगून पाण्याचे टँकर थांबता कामा नये. मानवी भूमिका ठेवून जनतेला मदत करा. सगळ्याात पहिली जबाबदारी म्हणजे टंचाईग्रस्त गावांना पाणी पोहचविले पाहिजे. टँकर मागणीनंतर तिसर्‍याच दिवशी टँकर पोहचला पाहिजे. राज्यशासन व जिल्हाधिकारी पातळीवर आम्ही मदत करु. पाण्याचे स्त्रोत आरक्षित केले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे टँकरने दिले जाणारे पाणी पिण्यायोग्य असले पाहिजे. ज्या गावांत पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांनी लवकरात लवकर टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. अधिकारी व तलाठ्यांनी गावोगावी जाऊन टंचाईचा आढावा घ्यावा. प्रवरेचे रोटेशन संपल्यानंतर ज्या गावांत पाणी टंचाई निर्माण होते, त्या गावांसाठी वेगळे नियोजन करा. केंद्र सरकारची रोजगार हमी योजना चांगली आहे. गाव बांधण्याची ताकद या योजनेत आहे. ज्या गावांत मजूर आहेत, त्या गावांमध्ये लगेचच रोजगार हमीची कामे सुरु करा. यासाठी ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे. 

यावेळी तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी आभार मानले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget