Breaking News

नगरसेविका कलावती शेळके यांचा शिवसेनेत प्रवेश


अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यात नगरसेविका कलावती शेळके यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्याचे पक्षात स्वागत केले. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, निलमताई गोर्‍हे, आ.विजय औटी, मा.आ. अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.