Breaking News

शिक्षण संस्थेत झालेल्या अडवणुकीच्या निषेधार्थ तहसील समोर मायलेकींचे उपोषण


नेवासा/प्रतिनिधी 
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता कृषितंत्र पॉलिटेक्निक या विद्यालयात होत असलेल्या अडवणुकीच्या निषेधार्थ नेवासा येथील तहसिल कचेरी समोर सविता लक्ष्मण पांडव व कु.अक्षदा दत्तात्रय कुंजाले या मायलेकींनी उपोषण सुरू केले आहे. मायलेकींच्या या उपोषणाला कॉ. बाबा आरगडे व साप्ताहिक संपादक संघटनेचे रमेश राजगिरे यांच्या सह अन्य लोकांनी पाठींबा दिला आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात सविता पांडव यांनी म्हटले आहे की भेंडा येथील जिजामाता कृषितंत्र पॉलिटेक्निक विद्यालयात आपण कृषी सहायक पदावर काम केलेले असून त्याच पदावर मला हजर करून घेण्यासाठी मला लेखी आदेश मिळावा तसेच 1/11/2012 ते जून 2015 या कालावधीत काम केले असून त्याचा अनुभवाचा दाखला मला मिळावा, माझी मुलगी अक्षदा हिचा 7 वी उत्तीर्ण झाल्याचा दाखला मिळावा व मुलीला मानसिक त्रास देणार्‍या उपप्राचार्य व दोन शिक्षिका यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात स्पष्ट केले आहे. माझ्यावर अन्याय झाला असल्याने मला याबाबत न्याय मिळावा. अशी मागणी सविता पांडव यांनी केली आहे.