शिवसैनिक प्रत्येकाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतो ः अनिल राठोड

नगर । प्रतिनिधी -
सध्या आरोग्यसेवा खर्चिक झालेल्या आहेत. त्यामुळे अनेकजण उपचारांपासून वंचित राहतात. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसू नये म्हणून मोफत चष्मा वाटप नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे. जनता हे आमचे कुटुंब आहे. शिवसैनिक हा तळागळातील लोकांमध्ये असतो. नगर शहरतील प्रत्येक भागामधला शिवसैनिक, पदाधिकारी हा सर्वांना सोबत घेऊन काम करतो आणि त्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होत असतो. नागरिकांची कोणतीही अडचण असली ती सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असतो. त्यामुळे शिवसैनिक हा प्रत्येक नागरिकांच्या कुटुंबातला भाऊ आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
नूतन प्रभाग क्र.13 मधील झारेकर गल्ली येथील जय तुळजाभवानी माता मंदिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचा शुभारंभ राठोड यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक सुभाष लोंढे, सभागृहनेते गणेश कवडे, महेंद्र बिज्जा, मदन आढाव, शशिकांत देशमुख, केतन गुंदेचा, योगेश सिद्दम, संतोष दोमल, सुरज शिंदे, सुरज संदुपटला, महेश चव्हाण, सोनू गिते, विष्णू कासार, अक्षय येमुल, कैलास संदुपटला, गणेश येमुल, निखिल गांधी, सागर शेंदुरकर, निकेश मुथा, पंकज झवेरी, योगेश चौधरी, किरण भुगे, सुनिल अबनावे, भैय्या वाघ, शंतनू मुदीगोंडा, बाळा बारस्कर, मयुर ठवण, चेतन लोंढे व नागरिक उपस्थित होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 871 गरजूंनी लाभ घेतला.
याप्रसंगी सुभाष लोंढे म्हणाले मी या भागात गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत आहे. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम सातत्याने करत आलो आहे. नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहून कायम त्यांचे प्रश्न, अडचणी मी सोडवत आलो आहे. त्यासोबत प्रत्येक धार्मिक सणही याभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात. त्यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना बक्षिसे देवून त्यांच्या कलेचा समान केला जातो. त्यामुळे या भागातील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे व त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget