Breaking News

आसाम, अरूणाचल प्रदेशसमोर पुराचे संकट


नवी दिल्ली : आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराचे संकट उभे आहे. आसाममधील 10 गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनच्या अखत्यारित येणा़र्‍या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्याने एका नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. 

16 ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झाले. त्यामुळे यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेले पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे. या नदीला अरुणाचल प्रदेशात सियांग नावाने ओळखले जाते. तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे. या नदीचे पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीनने भारताला दिली आहे.