Breaking News

वाईत शाळकरी मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल


वाई (प्रतिनिधी) : सात वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरेबाझार झोपडपट्टी, सिध्दनाथवाडी येथील सागर सुरेश जाधव (वय 20) व दोन अल्पवयीन (सर्व रा. गुरेबाझार झोपडपट्टी) या तिघांना वाई पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात बाललैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीवर सातारच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अटक केलेल्या संशयितांनी शुक्रवार, दि. 6 रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिडित मुलीला व्हाईटनर ओढायला जाऊ या असं सांगून तिला एसटी स्टॅड परिसरातील झाडीत नेले. तेथे पीडित मुलीला व्हाईटनर ओढायला दिला. काही वेळानंतर मुलीला गुंगी आल्यावर तिघांनी तिच्यावर जबरदस्ती करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पिढीत मुलीने याबाबतची कल्पना तिच्या आईला दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना झोपडपटीतून अटक केली. मुलीच्या अंगावर जखमा झाल्याने व मानसिक धक्का बसल्याने तिच्यावर सातारच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तिन्ही संशयिताच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सपोनि बबन येडगे करत आहेत