पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या; भडंगवाडी दरोडा प्रकरण; सर्वच दरोडेखोर गजाआड


बीड, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली होती.याच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने तपासाची चक्रे गतीने फिरवत अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

भडंगवाडीचे सरंपच ज्ञानेश्वर राधाकिशन नवले हे कुटूंबासह घराच्या छतावर झोपले होते. हीच संधी साधून चोरटे घरात शिरले. घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल घेत इतर ठिकाणी उचकापाचक केली. मात्र, हाती काहीच लागले नाही. नंतर शेजारीच असलेल्या सिताबाई मुरलीधर भोजगुडे यांच्या घरात प्रवेश केला. सिताबाई या एकट्याच राहतात. मंगळवारी रात्री त्या घर बंद करून आपल्या भाचीकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरातील रोख दहा हजार रूपये दरोडेखोरांनी लंपास केले. चोरट्यांनी अन्य एका घरामध्ये धुडघूस घालत महिलांना मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.घनशाम पाळवदे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे गजानन जाधव, गेवराईचे पोनि.दिनेश आहेर, सपोनि.दिलीप तेजनकर, अमोल धस, ए.बी.गटकुळ आदिंनी या प्रकरणाचा छडा लावत दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. आज दुपारी उशिरा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे आणि गेवराईचे पोलिस उपअधिक्षक अर्जुन भोसले हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाविषयी अधिक माहिती देणार आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget