Breaking News

युवा ऑलिम्पिक स्पर्धा ः भारताला हॉकीत रौप्यपदक


नवी दिल्ली : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकावर नाव कोरले आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या या अंतिम सामन्यात भारताला यजमान अर्जेंटिनाकडून 1-3 असा पराभव स्विकारावा लागला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणार्‍या भारताला शेवटपर्यंत सामन्यात पकड मजबूत ठेवता आली नाही. पहिल्याच मिनिटात गोल करून आघाडी घेतलेल्या भारताला शेवटी 1-3 अशा फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेंटिनाकडून जियानेल्लाने पहिला गोल केला. दुसरा आणि तिसरा गोल अनुक्रमे सोफिया, ब्रिसा यांनी करत अर्जेंटिनाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने दुसर्‍या सत्रात गोल करण्याच्या अनेक संधी हुकवल्या. या पराभवामुळे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकण्याची संधी गमावली.