Breaking News

संभाजी पाटील निलंगेकरच्या विरोधात आंदोलनकेज(प्रतिनिधी) धरण बीड जिल्ह्यात असताना पाणि वाटप समितीचे अध्यक्षपद लातूरला का या प्रश्नावर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे आजवर लातूरच्या एम, आय, डीसी, ला मांजरा धरणातून पाणी पुरवठा चालू आहे केज तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ लोकांवर आलि असताना प्रशासनाला गांभीर्य नाही.
याचा जाहिर निषेध आपण करत असल्याचे सांगत रात्रीत पाणीपुरवठा बंद करता अन् चालू करता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लोकांना उल्लू बनवू नये मांजरा धरणातून लातूर एम, आय, डीसी, ला पाणीपुरवठा बंद करून केज तालुक्यातील जनतेला पाणी ध्या नसता केज तहसील कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे