Breaking News

मोतीबिंदू शिबिरात ३० शस्त्रक्रिया : डॉ. गिरगुणे


राहुरी प्रतिनिधी

डॉ. विखे मेमोरियल हॉस्पीटल व रामकृष्णहरी क्लिनिक, बारगांवनांदूर यांच्या संयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोतीबिंदू व कानाच्या शिबिराचे उदघाटन मंगेश बाचकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी प्रकाश बन्सीलाल पारख होते.

प्रारंभी डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी प्रास्ताविक केले. या मोतीबिंदू शिबीरात नेत्रतज्ञ डॉ. प्रियांका कान्हेकर यांनी डोळ्यांचे रुग्ण तपासून ३० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविले. कानाच्या आजाराचे डॉ. अरविंद मिश्रा यांनी ६० पेशंट तपासून ३५ श्रवणयंञासाठी पाठविले. यावेळी विवेकगुरू कांबळे, दिलीप कोहकडे, विनायक भुसारे, राजेंद्र चोरंमुगे, अय्युब देशमुख, प्रभाकर वावरे, कारभारी आघाव, भारत गायकवाड, रामदास ढेरे, रामनाथ जऱ्हाड, रामभाऊ साळवे, विलास मंडलिक आदी उपस्थित होते. राजेंद्र नालकुल यांनी आभार मानले.