Breaking News

‘बलभीम’च्या खेळाडूंचे विभाग क्रीडा स्पर्धेत यश


बीड (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत बीड येथील बलभीम कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विभागीय पातळीवर यश मिळवले. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने क्रीडा स्पर्धांंचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बलभीम महाविद्यालयातील विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातील एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. २७ सप्टेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेत शिवाजी राजेंद्र कदम याने प्रथम तर दोनशे मिटर धावण्याच्या स्पर्धेत शिवाजी कदम याने द्वितीय क्रमांक पटकावला. विश्वजित अंगद बेदरे याने भालाफेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला तर अविनाश बंकट बेदरे याने ट्रिपल जंप प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. मुक्ताबाई लक्ष्मण मदगे हीने लांब उडी प्रकारात द्वितीय व गोळाफेक प्रकारात तृत्तीय क्रमांकाबरोरच २०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत तृत्तीय क्रमांक पटकावला. रिजवान पाशा शेख याने १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत तृत्तीय क्रमांक मिळवला.यशस्वी विद्याथ्यांचा महाविद्यालय अभ्यास केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत सानप, केंद्र संयोजक प्रा. सतिश पाटील, उपप्राचार्य डॉ. संतोष उंदरे, डॉ. गणेश मोहिते, विठ्ठल कोल्हे, प्रा. बालकनाथ यादव, एम. एन.चौरे यांची उपस्थिती होती.