Breaking News

राज्यात लवकरच दुष्काळाची घोषणा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


जळगाव : यावर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाकडून आम्हाला अहवाल प्राप्त होत आहेत. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प, विविध विकासकामांचा आढावा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व छत्रपती संभाजीराजे बंदिस्त नाट्यगृहाचे लोकार्पण या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौर्यावर आले आहेत. आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्‍विन सोनवणे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 67 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्पांमध्ये अत्यल्प तर मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आतापासून उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याबाबत आढावा बैठकीत संबंधित विभागांना निर्देश दिले. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले. शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यभरात धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 67 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्पांमध्ये अत्यल्प तर मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आतापासून उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याबाबत आढावा बैठकीत संबंधित विभागांना निर्देश दिले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस