Breaking News

गोवर व रूबेला लसीकरण मोहिम यशस्वी करावी : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे


बुलडाणा,(प्रतिनिधी): आयएम.ए.च्या सर्व सदस्यांनी गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेवून लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी केले आहे. आय.एम.ए.च्या सर्व सदस्यांची तीन दिवसीय परिषद बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. 

याप्रसंगी गोबर आणि रुबेला लसीकरण मोहिमेच्या खाजगी डॉक्टरांकरीता माहिती पुस्तीकेचे प्रकाशनही यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. राठोड, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी डॉ दिपाली गायकवाड, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रविंद्र गोफणे व सर्व खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा या कार्यशाळेनिमित्त आरोग्य प्रदर्शनीचा स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी या कार्यशाळेकरीता सर्व उपस्थितांनी या स्टॉलला भेट दिली. स्टॉल मधील आरोग्य कर्मचारी यांनी नवीन गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेची माहिती दिली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.