Breaking News

राम मंदिरासाठी मोहन भागवतांनी घातलं दगडूशेठला साकडं


सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी मंगळवारी सकाळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाला विधीवत अभिषेकही केला. अभिषेकादरम्यान भटजींनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रही म्हटले. त्यानंतर भागवत थोडं हसलेही.

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा मुद्दा गाजतोय. नागपूरमध्ये विजयादशमीला झालेल्या कार्यक्रमात राम मंदिर लवकरात लवकर बांधा असं म्हटलं होतं. त्यावर आज त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडंही घातलं.

पण सध्या राम मंदिर मुद्द्यावर श्रेयवादासाठी पक्षांमध्ये जुंपली आहे. आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने लवकरच अध्यादेश काढला पाहिजे. पण गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहोत. आता सगळेच आम्हाला फॉलो करत आहेत असं शिवसेनेनं म्हटलं होतं.