Breaking News

आमदार वंचित बहूजन आघाडीचाच हिंगणीच्या सत्ता परिवर्तन सभेत मान्यवरांचा सुर


बीड, (प्रतिनिधी)- या देशात गेल्या अनेक वर्षांपासून समता निर्माण करणार्या बहूजन वर्गाची सत्ता आलेली नाही. त्यामुळे त्यांचे हक्क,अधिकार आणि सामाजिक स्तर उंचावला गेला नाही. येत्या निवडणूकांमध्ये परिर्वतन अटळ असून माजलगाव मतदार संघाचा आमदार हा वंचित बहूजन आघाडीचाच असणार आहे, असल्याचे मत अनिल डोंगरे यांनी व्यक्त केले. येणार्या अगामी निवडणूकांमध्ये भारिप, एमआयएमचे राजकीय बळ वाढवित विषमतावादाला त्यांची जागा दाखवा असल्याचे प्रखड विचार शेख निजाम यांनी व्यक्त केले.
धारूर तालुक्यातील हिंगणी येथील श्रावस्ती नगर येथे शुक्रवार (दि.५) रोजी सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतान भारिपचे मराठवाडा नेते अनिल डोंगरे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटोळे, धारूर धालुकाध्यक्ष इंजि. प्रशांत उघडे, भारिप जिल्हासंघटक चरणराज वाघमारे, महादेव उजगरे, अशोक मगर,प्रदिप तुरूकमाने,शत्रुघ्न कसबे, अविनाश साळवे, अमोल उजगरे, मिलिंद गायकवाड, समाधान गायकवाड, संदिप फंदे, बाबुराव उघडे, शाम उजगरे, प्रविण ओव्हाळ, गोविंद उजगरे, अनिल उजगरे, अमोल बनसोडे, अक्षय मस्के, बाळासाहेब उजगरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना अनिल डोंगरे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात सामान्य माणसांना दैनंदिन जिवन जगने कठीण झाले असून प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. राष्ट्रवादीची जातीय समिकरणे आणि कॉंग्रेसची घरानेशाही यालाही लोक कंटाळले आहेत, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. माजलगाव मतदार संघातील वंचित बहूजन वर्गाला सत्ता, संपत्ती आणि सामाजिक स्तरापासून नेहमिच दुर ठेवले गेले आहे. अशा या दुर ठेवल्या गेलेल्या वंचित बहूजन वर्गाला ऍड.प्रकाश आंबेडकर आता आशेचा किरण वाटू लगले आहेत.