Breaking News

काँग्रेसने मतांचे राजकारण केले- मोदी


आजमेर - काँग्रेसने 60 वर्षात फक्त मतपेटीचे राजकारण केले. आता देश योग्य मार्गाने जात आहे. माझे सरकार सर्वजन हिताय, सुखाय उद्देशाने काम करत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. फूट पाडा आणि राज्य करा ही त्यांची मानसिकता असते. याउलट आम्ही संपूर्ण समाजाला जोडण्यासाठी काम करत आहोत अशी टिका करुन पंतप्रधान मोदी यानी काँग्रेसवर हल्लबोल केले. तर भाजपाचे गोडवे गाताने ते म्हणाले, मी देशासाठी, जगासाठी भले पंतप्रधान असेल. पण, भाजपासाठी मी आजही सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर जेव्हा केव्हा कुठली जबाबदारी सोपवली जाते तेव्हा मी समर्पित वृत्तीने ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो. ते आजमेर येथे बोलत होते.