Breaking News

सणासुदीच्या दिवसांत वीजेचे भारनियमन रद्द करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी


केडगांव / प्रतिनिधी

नवरात्र उत्सव आणि दसरा या सणासुदीच्या दिवसात नागरिकांना, विद्यार्थ्यांना भारनियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भारनियमन रद्द करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कोतकर यांनी दिला.

केडगाव उपनगराचा भाग असलेल्या नगर - दौंड मार्गावरील हनुमाननगर,इंदिरानगर आणि विद्यानगर येथील विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसांपासून वारंवार खंडीत होत आहे. शहरी भागात असुनसुध्दा ग्रामीण भागाप्रमाणे भारनियमन होत आहे. तरी अशा प्रकारचे भारनियमन तातडीने रद्द करण्यात यावे.

यावेळी संतोष साबळे, सुनिल गायकवाड, संजय गायखे, शुभम धामणे, संदेश गुजराथी, अतुल गायकवाड, शंकर भडांगे, अतुल शिर्के, पप्पु पवार, प्रशांत लगड, अक्षय निकाळजे, अनिल झिरपे आदी उपस्थित होते.