Breaking News

संतांचा सहवास आणि चांगले आचरण ही सेवाच : डाॅ. योगमाया


शिर्डी / प्रतिनिधी

अध्यात्मिक विषयावर प्रबोधन करणाऱ्या महिला साईभक्त योगमाया यांचा प्रवचनाचा कार्यक्रम शिर्डीत नुकताच पार पडला. त्यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, केवळ ग्रंथ वाचून ईश्वरप्राप्ती होत नाही. त्यासाठी संतांचा सहवास आणि चांगले आचरण ही एक सेवाच आहे. 

त्या म्हणाल्या, की साईंनी गोरगरींबाची सेवा केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली तर आयुष्य समाधानाने व्यतित होऊ शकते. अहंकाराचा त्याग केला पाहिजे. सर्वधर्मसमभाव यामुळे एकी निर्माण होणार असल्याचे सांगून साईंनी दिलेले नऊ नाणे, द्वारकामाईचे महत्व आदी विषयांवर त्यांनी विचार व्यक्त केले. शिर्डी ही पवित्र भूमी असून त्यामुळेच आज जगभरातून साईभक्त शिर्डीमध्ये दाखल येत त्या म्हणाल्या. यावेळी साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.