Breaking News

कर्मवीर आण्णांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण : ओंबाळे


केळघर (प्रतिनिधी) : कर्मवीर आण्णांनी संपूर्ण राज्यात शिक्षणाचे जाळे निर्माण केले असून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी या संस्थेत शिकूण आज ज्ञानदानाचे काम करत असून खर्‍या आर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थाची जडणघडण कर्मवीर आण्णांमुळे झाली आहे. आज या संस्थेत शिकून हजारो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असल्याचे प्रतिपादन केंद्रिय विभाग जल व उर्जा संशोधन विभागाचे नितीन ओंबळे यांनी केले.
जावळी तालुक्यातील केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यामंदीरात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य के. जी. कानडे, एस. पी. निकम, राजेंद्र गाडवे, मोहनराव कासुर्डे, बाजीराव धनावडे, केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक, नांदगणेचे सरपंच रविंद्र कारंजकर, मुख्याध्यापिका सौ. ए. पी. बिडवे, प्रकाश ओंबळे, विश्वास साळुंखे, सुरेश वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपप्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी कर्मवीर आण्णांची खडतर जीवनशैली, त्याग, जिद्द याविषयी विद्यार्थींना माहिती देवून भैरवनाथ विद्यामंदीर केळघरला भौतिक सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन दिले तर मुख्याध्यापिका ए. पी. बिडवे यांनी प्रास्ताविकात गुणवंत विद्यार्थी, शालेय निकाल, विद्यालयाच्या भौतिक सुविधांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. देवकर, व्ही. ए. जाधव यांनी केले तर डी. सी. आखाडे यांनी आभार मानले कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती. शाळा व्यवस्थापन समिती यांचेसह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.