Breaking News

जनसंघर्ष यात्रा समारोपच्या पार्श्‍वभुमीवर काँग्रेस कमिटीच्या नियोजन बैठकीत विखे पाटील यांचे मार्गदर्शन


अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा समारोप अहमदनगर येथे होणार आहे. या पार्श्‍वभुमीवर काँग्रेस कमिटीच्या नियोजन बैठकीत विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, आ.भाऊसाहेब कांबळे, धनंजय जाधव, नगरसेवक निखील वारे, मुदस्सर शेख, राहुल झावरे, करण ससाणे, हेमंत ओगले, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, उबेद शेख, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.