Breaking News

‘ती’ इच्छा पूर्ण न केल्याने सासऱ्याचा सुनेवर प्राणघातक हल्ला; विहिरीत उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न


राहाता प्रतिनिधी :

शरीरसुखाची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून चुलत सासऱ्याने सुनेवर धारदार शस्त्राने वार करत सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांनंतर स्वत: विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवरही लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राहाता तालुक्यातील केलवड गावात आज दि. ८ दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घडली. याबाबत जखमी महिलेच्या पतीने पोलीसात फिर्याद दाखल केली. सोमवारी यातील आरोपी नानासाहेब देवराम गोर्डे याने सदर महिलेच्या घरी जाऊन ती घरात एकटी असतांना तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने शारिरीक सुखाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून आरोपी गोर्डे याने तिच्या चेहरा, मान आणि हातावर कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळयात हातपाय खोडत पडलेल्या त्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी उपचारार्थ लोणी येथील रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.