बुथप्रमुखांच्या मेळाव्यास शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे - विशाल लव्हे


गेवराई (प्रतिनिधी ):- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मंगळवारी दि.२३-१०-१८ बीड शहरात मेळाव्यासाठी येत आहेत बीड शहरात होणार्या या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून सर्व बुथप्रमुख व गटप्रमुखांसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते विशाल लव्हे यांनी केले आहे 

शहरातील रामकृष्ण लॉन्स, कॅनॉल रोड, बीड येथे मंगळवारी दि.२३-१०-१८ रोजी सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे सदर मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे बुथप्रमुख व गटप्रमुखांशी चर्चा करून आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीबाबत माहिती घेणार आहेत या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संपर्कप्रमुख खा.चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संपदा गडकरी आदींसह पदाधिकार्‍यांची उपस्थित लाभणार आहे तरी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते विशाल लव्हे यांनी केल.े

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget