साई गणेश मंडळ व मंदिराच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न


माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव शहरामध्ये साई गणेश मंडळाच्या वतीने व साई मंदिराच्या वतीने गणेश उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, लंगडी स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत लहान मुलां मुलीं सह नवतरूणांनाी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विजेत्यांना हबाली बडवे (सरकारी वकील), उषाताई बनसोडे (नगरसेवक), शामलताई सोळंके, राहुल लंगडे (नगरसेवक), भगवान शेजुळ या मान्यवरांच्या हस्ते मानसन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची या खेळात महिलांमधुन मिना काळे व प्रणिता दहिवाळ, मुलींमध्ये प्रिया मुंडे व ॠतुजा दराडे लहान मुलांमधुन आनंद मुढीक व कुनाल दराडे.
होम मिनिस्टर या स्पर्धेत महिलांमधुन भाग्यश्री दराडे व कालिंदा औटे, मुलींमधून प्रणाली बागडे व अंजली झुटे, लहान मुलांमधुन तेजस काळे. रांगोळी स्पर्धेत तनुजा दराडे व आमृता मोगरेकर. डिश डेकोरेशन मध्ये छाया शेजुळ. रिंग मास्टर स्पर्धेत महिलांमधुन मोगरेकर, मुलींमधून प्रगती पंचलींगे, लहान मुलांमधे कृष्णा शेजुळ. लिंबू चमचा मध्ये मुलींमधून प्रणाली बागडे, मुलांमधे गणेश झुटे व स्वराज केचाळे या सर्वांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांना काल बक्षीसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन साई मंदिराचे संस्थापक संतोष मोगरेकर यांनी केले होते. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय कर्डिले, उपाध्यक्ष नंदु केचाळे, कोषाध्यक्ष स्वप्नील देवकते, सचिव गोटु दराडे, ॠषी दराडे, महेश देवकते, पिंटू तौर, परमेश्वर लंगोटे, तेजस शिंदे, सोनाली दराडे, ॠतुजा दराडे यांच्या सह गणेश भक्तांनी व साई भक्तांची उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget